पावसाच्या अधिवेशनामध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली. या हजेरीने अनेक नगरात – उपनगरात, जिल्ह्यात – तालुक्यात ओसंडून पडणाऱ्या पावसाने लोकांच्या मनात सतर्क राहण्याचे संकेत दिले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण असो किंवा खेड. असे अनेक शहरांमध्ये जोरदार पावसाची हजेरी लागली. कोकणातील सगळे नदी – नाले तुडुंब भरून ओसंडून वाहायला लागली. धरणे, तलाव, मोठ्या नद्यांना सुद्धा पुर परिस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी जमिनीचा पाया सरकला तर काही ठिकाणी डोंगरे कोसळली. काही घरे डोंगराखाली अडकून दबून गेली तर काही ठिकाणी झाडे वाऱ्यासह उडून मोडून पडली. या वर्षात पवासाची सुरुवात चांगली होता लोकांचे नुकसान ही तेवढेच केले. शेतकऱ्यांचे शेती लावूनही पाण्याखाली पसरून राहिली. दिवाण खवटी ठिकाणी रेल्वे रूळावर दरी कोसळून रुळाचा पाया विस्कळीत झाला. त्यामुळे रेल्वे ने करणारे प्रवासी हैराण होऊन राहिले. असे अनेक प्रसंग या पावसाळी अधिवेशनात घडून आले. त्यामुळे पावसाने या वर्षी चांगलीच लोकांची पंचाईत केली आहे.

Leave a comment